ममता दिनानिमित्त खाऊ वाटप

0

कर्जत । शिवसैनिकांच्या वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा 87 वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन 6 जानेवारी रोजी नेरळ शिवसेना शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी नेरळ शिवसेना शाखेत नेरळ शिसेनेच्या वतीने माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नेरळ शिवसेना शाखेच्या वतीने दरवर्षी ममता दिन साजरा करण्या येतो. यावर्षी साजरा करून नेरळ कन्या शाळा, नेरळ उर्दू शाळा व नेरळमधील अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी नेरळ पंचायत समिती विभागप्रमुख प्रभाकर देशमुख, नेरळ शहर अध्यक्ष रोहिदास मोरे, उप शहर अध्यक्ष बंडू क्षीरसागर, संपर्क प्रमुख किसान शिंदे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, श्रीकांत रावले, भास्कर क्षीरसागर, प्रमोद कराळे, गीतांजली देशमुख, पंचायत समिती सदस्या सुजाता मनवे, प्रीती देसाई, रोहिणी कासार, सुमन लोन्गले, माधवी क्षीरसागर, संगीता मोरे, जयश्री मानकामे आदी उपस्थित होते.