ममता नाही, क्रूरता…

0

सध्या माया आणि ममता केवळ राज्यातील मुस्लिमांंसाठीच आहेत, हे कृतींतून सातत्याने दर्शवणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हिंदूंचे दमन करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदूंचा विजयादशमी हा सण आणि मुस्लिमांंचा मोहरम हे सण यंदाच्या वर्षीही लागोपाठ आले आहेत. मुस्लिमांंचा मोहरम निर्विघ्नपणे पार पडावा; म्हणून ममता यांनी ‘हिंदूंनी 30 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजल्यापासून 1 ऑक्टोबरपर्यंत दुर्गामूर्तींचे विसर्जन करू नये’, असा सरकारी फतवा सोडला. मुस्लिमांंना शोक करता यावा; म्हणून हिंदूंच्या विजयोत्सवावर निर्बंध घालणार्‍या ममता यांचा हा निर्णय पक्षपाती आणि रझाकारी आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी सरकारच्या अशाच निर्णयाच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. तेव्हा न्यायालयाने सरकारला फटकारत ‘एका धर्मियांना खूष करण्याचा हा प्रयत्न आहे. यापूर्वी कधीही दसर्‍याच्या दिवशी मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आलेली नाही’, असे म्हटले होते. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत कानउघाडणी करूनही ममता यांनी पुन्हा तसाच निर्णय घेणे हा त्यांचा मस्तवालपणा आहे. न्यायालयाचाही एकप्रकारे अवमानच आहे. हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या या फतव्याच्या विरोधात देवीभक्त बंगाली बांधव पुन्हा न्यायालयीन लढा देतीलही; मात्र आता त्याच्या जोडीला हिंदुद्रोही राज्यकर्ते पदच्युत करण्यासाठी जनतेनेही लढा उभारणे आवश्यक आहे.

पश्चिम बंगालमधील इस्लामशाही
पश्चिम बंगालमध्ये होणारा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व यांचा कोंडमारा पाहिला की, राज्यात लोकशाही आहे कि इस्लामशाही असाच प्रश्न पडतो. ममता सरकारच्या काळात या वर्षी रामनवमी आणि हनुमानजयंती या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणूका धर्मांध आणि पोलीस यांच्याकडून लक्ष्य करण्यात आल्या. या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे हनुमानभक्तांनी काढलेल्या मिरवणुकीत ‘मिरवणुकीला अनुमती नसल्याचे सांगत’ पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, तर हुगळी येथे एप्रिल 2017 मध्ये मुस्लिमबहुल भागात श्रीरामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. त्या वेळी गावठी बॉम्बचा वापर करण्यात आला होता, तसेच काही दुकांनाची जाळपोळ करण्यात आली होती. मुस्लिमांंविषयी ममतेने वागणार्‍या ममता हिंदूंच्या संदर्भात मात्र क्रूरता होतात, हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘काही हिंदू गोमांस खातात. प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडीनिवडी असतात, हे विसरायला नको’, असे सांगत गोमांसभक्षणाचे समर्थन केले होते. इफ्तार मेजवानीत सहभागी होणे हिंदु धर्माच्या विरुद्ध असेल, तर मी त्या ठिकाणी नेहमी जाईन, असे वक्तव्य केले होते. शिजवलेले मांस घरोघरी पोहोचवण्यासाठी ‘मीट ऑन व्हील्स’ ही योजना प्रायोगिक स्तरावर चालू करण्याची घोषणा केली होती. याच सरकारने बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील प्रसिद्ध तारकेश्वर मंदिर बोर्डाच्या अध्यक्षपदी फिरहाद हकीम या मंत्र्याची नियुक्ती केली होती. 13 डिसेंबर 2016 ला हावडा जिल्ह्यातील धुलगडमध्ये धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या संदर्भातही ‘तो धार्मिक हिंसाचार नाही. ती लहान घटना आहे’, अशी प्रतिक्रिया देऊन धर्मांधांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वस्तूनिष्ठ वार्तांकन प्रसारित केल्याविषयी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांच्या विरोधात तक्रार करायलाही सरकारने मागेपुढे पाहिले नाही. 11 जानेवारी 2017 या दिवशी या सरकारने एका आदेशाद्वारे राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालयांमध्ये ईद-उद-मिलादच्या दिवशी ‘नबी दिवस’ (महंमद पैगंबर यांच्या जन्मदिन) साजरा करण्याचा आदेश काढला होता.

-अभय वर्तक
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387