ममता प्रभू विजयी

0

मुंबई । तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा टेबलटेनिसकडे वळलेल्या माजी आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू ममता प्रभूने ऑल मुंबई फोर स्टार स्पर्धा जिंकत आपले पुनरागमन साजरे केले. ममताने महिलांच्या अंतिम लढतीत रंगतदार लढतीत सेन्होरा डिसोझाचा 11-8, 11-9, 13-11, 7-11, 12-14, 12-10 असा पराभव करत विजेतेपद मिळवले. पुरूषांच्या गटात ज्युनीअर रेगन अल्बर्कक्सने दुसरा मानांकित निशांत कुलकर्णीचा 11-7, 11-3, 11-8, 11-9 असा पराभव करून अजिंक्यपद मिळवले. रेगनने उपांत्य फेरीत प्रथम मानांकित एरिक फर्नांडेसला 11-7, 11-13, 11-9, 13-11, 11-8 असा विजय मिळवला होता.