कोलकाता: लोकसभा निवडणूक संपली असून भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. दरम्यान संपूर्ण देशात पश्चिम बंगाल येथील निवडणूक चर्चेत होती, ती भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील संघर्षामुळे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री बॅनर्जी आणि भाजपातील संघर्ष टोकाला गेला. दरम्यान आता ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का बसला आहे. तृणमूलचे मुकुल रॉय यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांच्यासहित दोन आमदार आणि 50 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह हे दोन आमदार आहेत ज्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 24 परगणा जिल्ह्यातील 50 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.