लॉस एन्जल्स : 89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ’मूनलाईट’ला मिळाला. तर ’ला ला लँड’ चित्रपटाने सर्वाधिक सहा पुरस्कार मिळवत ऑस्कर सोहळ्यावर आपली छाप उमटवली. कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये भव्यदिव्य ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. जस्टिन टिंबरलेकच्या गाण्याने ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी रेड कार्पेटवर हॉलिवूडचे तारेतारका चमचमत होत्या. भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राही सहभागी झाली होती. तर मराठमोळ्या सनी पवारनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रियांकाची छाप
89 व्या ऑस्कर पुरस्काराच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियांका चोपडाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हॉलीवूड मध्ये आपली दुसरी कारकिर्द सुरू केलेली प्रियांका चोपडा गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड आणि पीपल्स चॉईस अवॉर्डमध्ये दणदणीत प्रवेश केल्यानंतर प्रियांका ऑस्कर अवॉर्डच्या रेड कारपेटवर पोहचली. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या या सोहळ्यात डिझायनर सिल्वर राल्फ व रूसो यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान करून अवतरलेली प्रियांका सुंदर दिसत होती. तिने नेहमी प्रमाणे हात जोडून सर्वांना नमसकार केला.
मराठमोळ्या सनी पवारचे कौतूक
लायन चित्रपटात देव पटेलची लहानपणीची भूमिका करणार्या सनी पवार ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. त्याने सार्या पुरस्कार सोहळ्याचे आणि हॉलिवूड कलाकारांचे लक्ष वेधून घेतले. अनेक सेलिब्रेटींना सनीसोबत सेल्फीही घेतले. लायन चित्रपटात सनीने साकारलेल्या भूमिकेबाबत बोलताना निवेदक जिम्मी किम्मेलने सनीला उचलून घेतल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाट झाला.
मेहर्शला अली पहिला मुस्लिम
मूनलाईट चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणारा मेहर्शला अली हा ऑस्कर जिंकणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मूनलाईट चित्रपटात अमली पदार्थांच्या डीलरची भूमिका त्याने केली आहे. मेहर्शलाला हा पुरस्कार मिळाल्याने भारतीय अभिनेता देव पटेलची ऑस्कर मिळविण्याचे स्वप्न भंगले. पटेललाही मानांकन मिळाले होते.
ट्रम्पविरोध येथेही
‘ला ला लॅण्ड’, ‘मूनलाइट’, ‘फेन्सेस’, ‘लायन’, ‘अरायव्हल’, ‘मँचेस्टर बाय द सी’, ‘हेल ऑर हाय वॉटर’, ‘हिडन फिगर्स’, ‘हॅकसॉ रिज’ या चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी चुरस होती. अखेर या स्पर्धेत ’ला ला लँड’ने बाजी मारली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कलाकरांकडून सुध्दा विरोध आहे. त्याची झलक या सोहळ्यातही पहावयास मिळाली. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटाचा पुरस्कार ज्यांना मिळाला ते इराणचे दिग्दर्शक असगर फरहादी अनुपस्थित राहिले.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाची चुकीची घोषणा
‘ला ला लॅण्ड’ची 2017 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषणा झाली. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चित्रपटातील कलाकारांनी मंचावर येऊन पुरस्कारही स्वीकारला. तेवढ्यात आणखी एक घोषणा झाली की, सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘ला ला लॅण्ड’ नसून ‘मूनलाईट’ आहे. यामुळे काही काळ सोहळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांच्या चुकीमुळे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘मूनलाईट’ऐवजी ‘ला ला लॅण्ड’ची घोषणा झाली होती.
पुरस्कार विजेते :
सर्वोत्कृष्ट चित्रपट – मूनलाईट
सर्वोत्कृष्ट अभिनेता – केसी अॅफ्लेक (मँचेस्टर माय द सी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एमा स्टोन (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – डॅमियन चॅझेली (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट पटकथा – बॅरी जेन्किन्स (मूनलाईट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मेहर्शला अली (मूनलाईट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – वायोला डेव्हिस (फेन्सेस)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – लीनस सँडग्रेन (ला ला लँड)
प्रॉडक्शन डिझाईन – ला ला लँड
सर्वोत्कृष्ट गीत – सिटी ऑफ स्टार्स (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट संगीत – जस्टीन हुरवित्झ (ला ला लँड)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले – केनिथ लॉनेरगन (मॅँचेस्टर बाय द सी)
सर्वोत्कृष्ट व्हिज्युएल इफेक्ट्स – द जंगलबुक
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड शॉर्टफिल्म – पायपर
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचरफिल्म – झुटोपिया
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट – द सेल्समन (इराण)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – ओ.जे.: मेड इन अमेरिका
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – कॉलिन एटवूड (फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम)
मेकअप आणि केशरचना – सुसाईट स्क्वॉड
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग – सलवेन बेलमेर (अरायव्हल)
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग – हॅक्सॉ रिज
सर्वोत्कृष्ट संकलन – जॉन गिल्बर्ट (हॅक्सॉ रिज)
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्टफिल्म – सिंग
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी (शॉर्ट सब्जेक्ट) – द व्हाईट हेल्मेट्स