मयताचा प्लॉट लाटण्यासाठी तोतयाची घेतली मदत

0

धुळे । गुरूवारी सह निंबधक कार्यालय येथे चार जण देवपूरातील एस वन प्लॉट नंबर 45 ह्या मालमत्तेची खरेदी विक्री व्यवहाराची दस्तनोंदणी करण्याच्या उद्देशाने आले. यावेळी त्यांनी साहेबराव दौलत जाधव या नावाचा व्यक्ती उभा करुन त्याच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करीत सह्या करुन प्लॉट विक्रीचा व्यवहार केला. मात्र साहेबराव जाधव बनून आलेला ती व्यक्ती चक्क तोतया असल्याचे आणि सदर प्लॉट मालक असलेले साहेबराव जाधव हे मयत असल्याचे उघडकीस आल्याने शासनाची फसवणुक केली म्हणून दुय्यम निबंधक महमंद अब्दुल हक रा.आयशानगर, चाळीसगाव रोड, धुळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन विश्‍वनाथ एकनाथ फुलपगारे, मयत साहेबराव दौलतराव जाधव यांच्या नावाने उभा राहणारा तोतया इसम आणि भारत सुकलाल फुलपगारे, राहुल अरुण रोटे सर्व रा.देवपूर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.