मयताच्या वारसांना विमा रक्कम प्रदान

0

शहादा। वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यास अपघात विमा मंजुर झाला.वसंतराव नाईक महाविद्यालयातील शै.वर्ष 2016-17 मधील तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थी ललित शशिकांत निकुंभे रा. शिरुड ता. शहादा या विद्यार्थ्याचे दि. 9 फेब्रुवारी रोजी शहादा दोंडाइचा रस्त्यावर अपघाती निधन झाले. विद्यालयात विद्यार्थी कल्याण विभागामार्फत विमा काढलेला असतो. प्रस्ताव 20 दिवसाच्या आत सादर केल्यास हा विमा पास होतो.

2 लाख 35 हजार एवढी रक्कम
त्याची रक्कम 2,25000 असते व कुलगुरुनिधी 10,000 अशी एकुण 2 लाख 35 हजार रक्कम एवढी होते.हा संपुर्ण निधी कै.वसंतराव जयंतीनिमीत्ताने 1 जुलै रोजी संस्थेचे विभागीय सचिव संजय जाधव व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव वर्षा जाधव यांचा हस्ते विद्यार्थ्याचे वारसदार शशिकांत निकुंभे यांना दिला. यावेळी संस्थेचे समन्वयक संजय राजपुत,प्रा. डॉ.ए.एन.पाटील,उपप्राचार्य आर.बी.मराठे,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. के पाटील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.बी.पाटील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.