भुसावळ । धुळ्यात उष्माघाताने भुसावळ येथील बसचालक प्रमोद आनंदा कोळी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या परिवारास एसटी कामगार सेनेतर्फे 25 हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अक्कलकुवा ते पुणे दरम्यान नियोजित कर्तव्य बजवित असतांना प्रमोद कोळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.
परिवहन मंत्र्यांनी दिले लाभ देण्याचे आदेश
सदर दुर्दैवी घटनेची दखल परिवहन मंत्री रावते यांनी घेतली असून त्यांना मिळणारे अंतिम देयके व नियमानुसार मिळणारे लाभ तात्काळ देण्याचे आदेश अधिकार्यांना दिलेले आहेत. कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी देखील दूरध्वनीद्वारे स्व. प्रमोद कोळी यांच्या परिवाराशी संवाद साधून शोक संवेदना व्यक्त केल्यात.
यांची होती उपस्थिती
साक्री या गावी जाऊन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय पदाधिकारी कार्याध्यक्ष आर.के. पाटील, विभागीय सचिव संजय सूर्यवंशी, गोपाळ पाटील, संघटक सचिव प्रकाश ठाकरे, जळगांव आगार सचिव आर.आर. शिंदे, कैलास साळुंखे, सुभाष सोनवणे, जगन गोसावी, दीपक कोळी, सुभाष सपकाळे यांनी त्यांच्या परिवारास संवेदना व्यक्त करून महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून 25 हजारांचा चेक सुपूर्त केला.