आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते कुटुंबास धनादेश सुपूर्द
फैजपूर- लोकसभा निवडणुकीचे कामकाज करताना जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयातील लिपीक पंकज गोपाळ चोपडे (रा.न्हावी) यांचा 23 एप्रिल रोजी मृत्यू ओढवला होता. त्यांच्या पश्चात वारस पत्नी वर्षा पंकज चोपडे यांना शासनामार्फत मदत म्हणून 15 लाखांची मदत धनादेश स्वरूपात 29 मे रोजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांतधिकारी अजित थोरबोले, मसाका चेअरमन शरद महाजन, न्हावी सरपंच भारती चौधरी, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत तळेले, दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शयण चौधरी, मंडळाधिकारी जे.डी.बंगाळे, तलाठी लीना राणे, कोतवाल दीपाली बारी, किरण धनगर, गोपाळ चोपडे, भास्कर चोपडे, सागर इंगळे, रमण महाजन, हजर होते. स्व.पंकज चोपडे हे जे.टी.महाजन तंत्रनिकेतनमध्ये नोकरीस होते शिवाय घरातील ते एकमेव कर्ताही होते. लोकसभा निवडणुकीत त्यांची ड्युटी लागली होती. यावल येथे मतदानाचे साहित्य घेऊन जात असतांना रस्त्यात त्यांचा मृत्यू ओढवला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने घराची जबादारी त्यांच्या पत्नीवर आली होती. त्याच अनुषंगाने शासनाकडून 15 लाखांचा धनादेश देण्यात आला.