मयत शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जमाफ करून वारसांना नवीन कर्ज द्यावे: मयत शेतकरी पुत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

जळगाव: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. यात दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान शासनाने मयत शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जमाफ करून त्यांच्या वारसांना नवीन कर्ज द्यावे अशी मागणी भादली बु. येथील मयत शेतकऱ्यांच्या मुलाने पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. भादली बु. येथील मयत शेतकरी चावदास राघो पाटील यांचा मुलगा प्रमोद पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने असणारा कर्जमाफ करण्यात येऊन नवीन कर्ज वारसाला तातडीने उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी केली आहे. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी यादीतील पात्र शेतकऱ्याने आधारकार्ड लिंक करण्याची अट घालण्यात आलेली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मात्र शासनाने या शेतकऱ्यांचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.