मयुर वांजळे ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

0

चिंबळी : कुरूळी( ता खेड ) येथे श्री भैरवनाथ महाराज व खंडोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी आयोजित केलेल्या कुस्तीस्पर्धेत शिवराज बालवडकर विरुद्ध मयुर वाजंळे यांच्यात निकाली कुस्तीस्पर्धे मध्ये तब्बल पधंरा मिनिटे निकाली कुस्ती करून मयूर वाजंळे याने शिवराज बालवडकरला चितपट केले. पाडूरंग सोनवणे यांच्या वतीने एक किलो चांदीची गदा देण्यात आली.

कुस्ती स्पर्धेचा सुभारंभ सरपंच चंद्रकांत बधाले व यात्रा कमिटीचे अध्यक्ष एम. के. सोनवणे व सर्व संचालकाच्या हस्ते करण्यात आला. 150 मंल्लानी सहभागी होऊन आखाड्याची शोभा वाढवली.याप्रसंगी माजी जि. प. सदस्य शातांराम सोनवणे, शातांराम घाडगे, मल्हारी बागडे ,शातांराम बागडे, गुलाब सोनवणे, आशिष मुर्‍हे,सागर मुर्‍हे, रमेश बागडे, सजंय मुर्‍हे, अनिल बागडे, सुरेश गायकवाड, भरत कड, बाळासाहेब मुर्‍हे, पाडूरंग बनकर, काळूराम कड, ज्ञानेश्‍वर गोसावी, सुर्यकांत बधाले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पैलवानांना गावच्या वतिने 100 रूपये् ते 15 हजार रूपये व ट्रॉफी असे बक्षीस देण्यात आले. तर सरपंच चंद्रकांत बधाले यांच्या वतिने गावच्या पैलवानांना ट्रॉफी व रोख स्वरूपाचे बक्षीस देण्यात आले.