आळंदी : मरकळ-आळंदी रस्त्यावरील कमळजाईनगर, मरकळ (ता.खेड) येथे दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करीत असताना झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी झाली. अपघातातील जखमीस तत्काळ उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस कर्मचारी अरुण भोसले यांनी दिली. अपघातात संतोष भरत मुंढे (वय 20,रा.हिब्बर,पो.मोटारगा, ता. मुखेड, जिल्हा नांदेड) हा ठार झाला आहे. तर त्याच्या मागे बसलेला गंभीर जखमी असून त्याचे नाव समजू शकले नाही. याबाबत सुनील काळुराम लोखंडे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास हवालदार विजय चासकर करीत आहेत.