मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिक्षकांचा सन्मान

0

शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी-चिंचवड : मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिक्षक दिनी ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला अरूण पवार, गोपाळ माळेकर, सूर्यकांत कुरूलकर, दत्तात्रय धोंडगे, मुख्याध्यापिका विजयश्री काजळे, लवटे, प्राचार्य वडदरे, वामन भरगंडे, लता कुमदाळे, सुवर्णा नांदगावे, बळीराम माळी, गरजे, आनंद कुमदाळे, इंगळे, अदिती निकम, विशाल खुने, मालोजी भालके, रेहमान सुतार आदी उपस्थित होते.

शिक्षण हा तिसरा डोळा
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सूर्यकांत कुरूलकर म्हणाले की, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. कारण आजच्या दिवशी सर्वजण आपापल्या गुरूंबद्दल आपल्या भावना व्यक्त करतात. गुरुवीण विद्या नाही आणि विद्याविन सर्व जग शून्य आहे, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात बोलताना अरूण पवार म्हणाले की, शिक्षण हा मनुष्याचा तिसरा डोळा आहे. डोळस माणसाकडे शिक्षण नसेल तर त्याच्या डोळे असण्याला काहीही अर्थ नाही. गुरूंच्या प्रेरणेने सामाजिक प्रगती होते. प्रगतीची सुरुवात साधारण गावापासून होते आणि तिचा शेवट विश्वाच्या विकासासोबत होतो. आयुष्यात पावलोपावली आपल्याला कोणी ना कोणी शिकविणारा गुरू मिळतो. त्या प्रत्येकाबद्दल आपण सतत कृतज्ञ राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी केले. आभार गोपाळ माळेकर यांनी मानले.