सांगवी : प्रतिनिधी मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवाराच्या वतीने मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपळे गुरव, राहटणी येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये अन्नदान, वृक्षारोपण, खाऊवाटप, पुरस्कार प्रदान, विविध स्पर्धा याचा समावेश होता.
पिंपळे गुरवमधील ममता अंध अनाथ कल्याण केंद्र येथे अनिकेत यादव मित्र परिवार यांच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना अन्नधान्य आणि फळे, श्रीमती शेवंताबाई खंडूजी जगताप प्राथमिक विद्यालयात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकार्यांतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच रहाटणी येथे सचिन बालक मंडळ येथे गोपाळ माळेकर मित्र परिवाराच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप, जेष्ठ समाजप्रबोधनकार शारदा मुंढे यांचा एकपात्री प्रयोग झाला. दरम्यान, विद्यार्थी गुणगौरव, माता-पिता यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सरस्वती भुवन इंग्लिश स्कूलमध्ये कथा-कथन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी पवार यांच्या गौरवापर श्रीनिवास बढे, तानाजी जवळकर, बाबासाहेब त्रिभुवन यांची भाषणे झाली. तसेच त्यांना ‘समाजसेवक’ ही पदवी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, ह.भ.प. शिवानंद महाराज, शिवकीर्तनकार गजानन वाव्हळ, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, जयसिंग जगताप, विजय जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, शत्रुघ्न काटे, सागर आंघोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, उषा मुंडे, आश्विनी बोबडे, योगीता नागरगोजे, कमला घोलप, चंद्रकांता सोनकांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, उषा ढोरे, शारदा सोनवणे, चंद्रकांत नखाते, सविता खुळे, नरेंद्र माने, संजय कीर्तने, प्रकाश इंगवले, संतोष जगताप, धनाजी येलेकर, संजय घुमरे, सचिन चव्हाण, दिनेश पवार, दिगंबर सुरवसे, तसेच भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, संत गाडगे बाबा जेष्ठ नागरिक संघ, माजी सैनिक जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते