सांगवी : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन एकसंघ समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय, काळेवाडी येथे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर एम. एम. कॉलेज ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकादरम्यान भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भोसरीतील स्व. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
यांची होती उपस्थिती
यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार सुजितसिंग ठाकूर, महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे अध्यक्ष अरूण पवार, उपमहापौर शैलजा मोरे, भाऊसाहेब जाधव, आळंदी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, सहायक आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, अशोक कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, योगिता नागरगोजे, निकिता कदम, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, शत्रुघ्न काटे, ह.भ.प. शिवानंद महाराज, ह.भ.प. गजानन वाव्हळ, व्यंकटेश जामदाळे, साहेबराव धुमाळ, बळीराम माळी, शिवदास हांडे, विजय सोनवणे, नवनाथ गीते, सुहास दुघनव, किसनराव पालवे, संतोष फाळके, आश्रुबा पालवे, सतीश आव्हाड, श्रीनिवास दुघनव, बाळू सुतार, अनिल सुतार, किरण चौधरी उपस्थित होते.
मराठवाड्यातील गुणवंतांचा सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मराठवाड्यातील भूमिपूत्र डॉ. राघवेंद्र शाईवाले, गोपाळ माळेकर, राजेंद्र हुंजे, विश्वंभर चौधरी, शिवाजीराव जाधव, बापूसाहेब गायकवाड, गिरीधर काळे, रमेश जाधव, शारदा मुंढे, राम सातपुते यांचा ‘मराठवाडा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. मूळची मराठवाड्याची असणारी गायिका कार्तिकी गायकवाड हिने विविध गीते सादर करीत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ह.भ.प. गजानन वाव्हळ यांनी मराठवाडा शौर्यगाथा कथन तत्कालीन इतिहास डोळ्यासमोर मांडला.