५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी साडेचार हजार कोटीचा प्रोजेक्ट

0

मुंबई : मराठावाडा विदर्भातील ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी ४ हजार कोटीचा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. यासाठी जागतिक बँकेकडून सहायय घेतले जाणार असून, त्याचा डीपीआर तयार करण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील जलयुक्त शिवार योजनेसंदर्भातच्या प्रस्तावावर नियम २६० अन्वये चर्चा सुरू होती त्यावेळी मंत्रयानी ही माहिती दिली. पीक विमा संदर्भातचे मुद्देही चर्चेदरम्यान उपस्थित झाले होते त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, पीक विमा योजनेतंर्गत २०१५ मध्ये ७१ ५० लाख शेतक-यांना ५ हजार कोटी तर २०१६ मध्ये पीक वीमा योजनेत १ कोटी ८ लाख शेतक-यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी गारपीठ व वादळीवारा झाल्याने १६४० कोटी रूपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे. पूर्वी पीक विमम्याचा हप्ता 3.5 टक्के होता आता २ टक्के करण्यात आला आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हयात विमा हप्ताचा ५० टक्के अनुदान सरकार देणार आहे असे कृषीमंत्रयानी सांगितले. राज्यभरात दोन हजार हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गारपीट दुष्काळ आणि पाऊस किती पडेल याची माहिती शेतक-याला आठ दिवसात मिळणार आहे. तसेच यापुढे जमिनीचे परिक्षणही करण्यात आले आहे राज्यभरात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्याचा निधी देणार आहे असेही फुंडकर यांनी सांगितलं.