मराठवाडा हा संघर्षमय भूमीचा वारसा

0

ज्येष्ठ लेखक राजेंद्र कोरे यांचे प्रतिपादन

पिंपरी : मराठवाडा युवा मंच म्हणजे मराठवाड्याचा संघर्षमय भूमीचा वारसा चालविणारा संघ होय. मराठवाडा ही संतांची संघर्षमय इतिहासाची पवित्र भूमी आहे. स्वार्थ, अहंकार, जातीधर्म भेदभाव न पाळणारा असा हा संघ आहे. संघाने आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, निवेदक व कवी राजेंद्र कोरे यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मराठवाडा युवा मंचच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राजेंद्र कोरे यांना ‘मराठवाडा जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी जीएसटीचे अप्पर आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, फायनान्स आयुक्त संतोष परगे, सहाय्यक आयुक्त संग्राम जमालपुरे, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर, प्रसाद कानडे, तहसीलदार किरण काकडे, पोलीस निरीक्षक महेश स्वामी, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, वृत्तनिवेदक विलास बडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कोरे यांना पुरस्कार
यावेळी लेखक राजेंद्र कोरे यांना ‘मराठवाडा जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, शाल, श्रीफळ असे होते. मानपत्राचे वाचन रामेश्वर गटकळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यजित चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता नाईक व मंगेश केलाडे यांनी केले. आभार अक्षय शहरकर यांनी मानले.