मराठवाड्यातील विकासाचा दुष्काळ संपविणार: मोदी

0

बीड: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीड येथे पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार तसेच विकासाच्या मार्गातील दुष्काळ संपविणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळणार असल्याचा दावा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा पुनरुच्चार करत विरोधकांना टोला लगावला. ३७० ला विरोध करणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? असा टोलाहे मोदींनी लगावला.