औरंगाबाद । मराठवाड्यातील दुष्काळ, नापिकी, गारपीट आणि डोक्यावरील वाढत जाणार्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ होत आहे. 1 जानेवारी ते 28 मे 2017 दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात तब्बल 361 शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. यामध्ये आर्थिक मदतीसाठी प्रशासकीय स्तरावर शेतकर्यांच्या आत्महत्यांचे 231 प्रकरणे पात्र ठरली आहे तर 86 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला यामध्ये एक लाखांची मदत केली जाते.
1 जानेवारी ते 28 मे दरम्यान 361 शेतकर्यांच्या आत्महत्या
मागील चार ते पाच वर्षापासून मराठवाड्यात कमी पर्यजन्यमान होत असल्याने विहरी कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे हजारो हेक्टर जमीन कोरडवाहु झाली आहे. कित्येक ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळणे अवघड झाल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत. बहुतांश शेतकरी कर्जबाजारी झाल्याने त्यांनी मृत्युला कवटाळले आहे. मराठवाड्यात 1 जानेवारी ते 28 मे दरम्यान 361 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. शेतकर्यांच्या आत्महत्यासंबंधी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने यातील 231 प्रकरणे पात्र ठरविले आहेत तर 44 प्रकरणे अपात्र घोषित केले. तसेच 86 प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या तपासणीसाठी प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रकरणांचा निपटारा लवकरच
शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार गंभीर आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबाला तातडीने मदत मिळावी म्हणून सरकारच्या वतीने पावले उचलीली जात आहेत. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्रूटी आढळल्यास प्रकरमाला वेळ लागतो. परंतू जाणिवपुर्वक कोणत्याही शेतकर्यांच्या कुटूंबाची अडवणूक केली जामार नाही, याची काळजी सरकार घेत असून तसे आढळल्यास दोषी अधिकार्यावर कडक कारवाई केली जाईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे
जिल्हे…………….प्रकरणे………………..पात्र………………….अपात्र…………….प्रलंबित
औरंगाबाद………….50…………………28………………….12………………..10
जालना……………..32…………………26………………….00………………..06
परभणी……………..43…………………27………………….06……………….10
हिंगोली……………..22………………….11…………………02……………….09
नांदेड……………….63…………………43………………….07…………….. .13
बीड………………..68………………….47…………………..02……………….19
लातुर……………….28………………….15………………….04……………….09
उस्मानाबाद…………..55………………..34………………….11……………….10
एकूण……………….361……………….231…………………44………………86