पुणे-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. दरम्यान आजपासून जेलभरो आंदोलन देखील केले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेल्हे गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. दोन तरूण थेट इलेक्ट्रीक टॉवरवर चढले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तरुणांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.