धुळे : मराठा आरक्षणाच्या न्याय मागण्यासाठी गेले आठ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे रोज विविध प्रकारच्या आंदोलन केले जात आहे. शनिवारी दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या तर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. एक मराठा लाख मराठा , शिवाजी महाराज की जय, अस कस देत नाही घेतले शिवाय रहात नाही अशा जोरदार घोषणा देत चाळीसगाव येथून धुळे येथे येणारीरेल्वे अडविण्यात आली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, निंबा मराठे, सजय वाल्हे, योगेश थोरात, आबा जाधव, दिपक रंवदळेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था प्रश्ननिर्माण होऊ नये म्हणून मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक एस जे. महाजन यांनी दिली आहे.