मराठा आंदोलन: पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घोषणाबाजी

0

पुणे-राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न सध्या पेटला आहे. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने हिंसा झाली आहे. ता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत. आज सकाळपासूनच पुण्यात या आंदोलनाला सुरवात झाली आहे.

सकाळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कार्यालयाकडे वळवला आहे. यावेळी जागे व्हा जागे व्हा ! दिलीप कांबळे जागे व्हा या घोषणा देत हे आंदोलन केले.

दरम्यान, उद्या सकाळी 10 वाजता आमदार मेधा कुलकर्णी तर 11 वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या घरासमोर देखील आंदोलन कर्त्यांनी घोषणाबाजी केली.