मराठा आंदोलन: मुख्यमंत्र्यांशी चर्चा नाही

0

मुंबई-मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार नाही, अशी घोषणा कोल्हापूरमधील राजर्षी शाहू महाराज, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी केली आहे. मराठा समाजाने या अगोदर ५८ मोर्चातून निवेदने दिली आहे. त्यामुळे आता चर्चेचा विषय नाही असे सांगण्यात येत आहे.

उद्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठकीसाठी राजर्षी शाहू महाराज, जयसिंगराव पवार आणि प्रतापसिंह जाधव यांना बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी शाहू महाराज आणि जयसिंगराव पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली.

सरकार आरक्षणासंदर्भात चालढकल करत आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिलेले असून अशाच पद्धतीने महाराष्ट्रातही मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ब वर्ग) असा नवा प्रवर्ग करुन त्यामध्ये आरक्षण द्यावे, त्यामुळे विद्यमान इतर मागासवर्गीय घटकांना फटका बसणार नाही आणि त्यांची नाराजीही येणार नाही. या आधारे अध्यादेश काढून सरकार मराठा आरक्षण देऊ शकते. आता या करिता चर्चेला जाण्याची गरज नाही, असे मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजीत सावंत, दिलीप पाटील, हर्षल सुर्वे, अवधूत कुंटे, सचिन तोडकर गुलाबराव घोरपडे यांनी सुचवले.