धरणातच्या पाण्यात केले प्रतिकात्कात्क आंदोलन
चोपडा- तालुक्यातील बिडगाव या अवघ्या पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावातील मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी सातपुड्यातील चिंचपाणी धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास हे आंदोलन चालले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बिडगाव गावातील ६० तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आम्ही सातपुड्यातील चिंचपाणी धरणात जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत लेखी पत्र दिले. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय चव्हाण, तहसीलदार दिपक गिराशे स्थानिक ग्रामस्थ व तरुणांची समजुत काढली. मात्र आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम होते.
प्रशासनातर्फे तहसिलदार दिपक गिरासे यांनी निवेदन स्विकारले.संभाजी ब्रिगेडचे संजीव सोनवणे, माजी जि.प.सदस्य डिगंबर पाटील, राष्ट्रवादी काॅग्रेसचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, मनोहर देशमुख, रावसाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.