स्व.काकासाहेब शिंदेना श्रद्धांजली
चोपडा । मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासाठी संबंध महाराष्ट्रभर 18 जुलै पासून मोर्चे सुरु झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चा च्यावतीने बुधवारी 25 रोजी सकाळी 10 वाजता धरणगाव रोडवर रणगाडा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन प्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा तरुण स्व.काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रास्तारोको आंदोलन सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सुरू होते मात्र आंदोलन शांततेत पार पडले यावेळी अभुतपुर्व पोलिस बंदोबस्त होता.
आंदोलन तिव्र करण्याचा इशारा
एस.बी.पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठा आरक्षण देण्या संदर्भात शासनाने रामभाऊ माळघी प्रबोधनी या आर एस एस चा अधिपत्याखाली असलेल्या संस्थेला महाराष्ट्रात सर्वक्षणाचे काम आले देण्यात असुन त्यात ब्राम्हण मंडळींना सर्वक्षणासाठी नेमले आहेत हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा ब्राम्हणी कावा असुन मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणून सरकारच्या विरोधात समाजाला यापुढील आंदोलन तिव्र करावे लागणार आसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.
रास्तारोकोत यांचा सहभाग
रास्तारोको आंदोलनामुळे चोपडा, धरणगाव, अमळनेर, शिरपुर, यावल या शहराकडे जाणार्या एस.टी.बसेस सह आदि असंख्य वाहणांचा लांब रांगा लागल्या होत्या यामुळे असंख्य प्रवाशांची सुमारे एक तासा गैरसोय झाली. रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे, सुकाणू समिती सदस्य एस.बी.पाटील, जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, कृउबा समितीचे संचालक धनंजय पाटील, दिनकर देशमुख, नगरसेवक डॉ.रविंद्र पाटील, शिवसेनेचे गटनेता भैय्या पवार यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.