मुक्ताईनगर शहरात कँडल मार्च : मराठा समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग
मुक्ताईनगर- मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्या किशोरी बबन काकडे हिला श्रद्धांजली देण्यासाठी ग्रामीण मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने शहरातील प्रवर्तन चौकात रविवारी रात्री साडेसात वाजता कँडल मार्च काढण्यात आला व शोकसभा घेण्यात आली. राधाबाई काळे महिला महाविद्यालयात किशोरी ही अकरावी सायन्स शाखेत शिकत होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासाठी माझे बलिदान देत आहे, असं तिनं म्हटलं होते. आरक्षणाअभावी दहावीत 89 टक्के गुण मिळूनही अनुदानीत तुकडीत प्रवेश मिळाला नाही. चांगले गुण असूनही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागला, अशी या भगीणीची खंत असल्याचे प्रसंगी मान्यवरांनी सांगितले. रात्री साडेसात वाजता कँडल मार्च प्रतिभा नगर, बसस्थानक, प्रवर्तन चौकात पोहोचला. प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.