मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या शिंदे यांच्यासाठी मदतफेरी

0

समाजासाठी प्राण त्यागणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबासाठी मदत निधी हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम

मुक्ताईनगर- मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या स्व.काकासाहेब शिंदे यांनी समाजासाठी आत्मबलिदान देत समाजाप्रती जी भावना दाखविली आहे त्याच भावनेतून समाजानेही त्यांच्यासाठी काहीतरी करावे व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा त्यात सिंहाचा वाटा रहावा यासाठी तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चा ग्रामीणतर्फे मदत निधीसाठी जागर रॅली फिरविली जात आहे. अंतुर्ली-उचंदा जिल्हा परीषद गट व कुर्‍हा-वढोदा जिल्हा परीषद गट गटातील प्रत्येक गावांतून मदत निधी गोळा करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील एक-एक गावातून निधी संकलीत केला जाणार आहे. निधी संकलनासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व मराठा बांधव प्रचंड मेहनत घेत आहे.

मदत निधी हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम
समाजासाठी प्राण त्यागणार्‍या व्यक्तीस मदत निधी यात्रा हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबविला जात आहे. हुतात्मा काकासाहेब मदतनिधी यात्रेस उचंदा येथून सुरुवात झाली. पुढील गावांमध्ये मदत निधी यात्रा येताच गावातील नागरीकांनी व युवकांनी स्वतः सहभागी होत मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे तसेच निधी जमा झाल्यानंतर स्व.काकासाहेब शिंदे यांच्या परीवाराच्या स्वाधीन करण्यात येईल, असे मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य अ‍ॅड.पवन चोपडे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.