मराठा आरक्षण: आणखी एका तरुणाची आत्महत्या

0

औरंगाबाद – मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर प्रमोद होरे पाटील या तरुणाने मराठा आरक्षणासाठी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रमोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे, अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकली होती.

रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु ते आढळून आले नव्हते. नंतर पोलिसांनीच घरी पोहोचून आईवडिलांना घटनेची माहिती दिली. तेव्हा हा प्रकार उजेडात आला. प्रमोद पाटील यांनी फेसबुकवर मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करतोय, अशा आशयाची पोस्ट टाकली आहे. अधिक तपास सुरू आहे.