पुणे-मराठा आरक्षणासाठी मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे यांनी राजीनामा दिला आहे. जनतेसोबत असल्याचे सांगत त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अपहारप्रकरणी रमेश कदम सध्या जेलमध्ये आहेत. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. ‘सबका साथ सबका विकास’ हे ब्रीद वाक्य घेऊन मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी राजीनामा देत असल्याचे कदम म्हणाले.