मराठा आरक्षण: पिंपरी-चिंचवडमध्ये तोडफोड

0

पुणे-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पिंपरी-चिंचवड भागात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आंदोलकांनी आळंदी, खेड, चाकण, हिंजवडी येथे बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे हिंजवडी वगळता सर्वत्र कडकडीत बंद असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, चाकण येथे काही आंदोलकांनी हिंसक होत ३ एसटी आणि १ पीएमपी बसवर दगडफेक करीत त्यांच्या काचा फोडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, अर्ध्यातासापूर्वी आंदोलकांनी राजगुरूनगर-खेड येथे पुणे-नाशिक महामार्ग रोखला होता. येथे आंदोलकांनी १ तास ठिय्या आंदोलन केले. आजवर शहरी भागात झालेल्या मराठा आंदोलनांनंतर आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हे आंदोलनाचे लोण पोहोचले आहे. आळंदी, खेड, चाकण, हिंजवडी येथे बंद पुकारल्यानंतर येथील नागरिकांनी उस्फुर्तपणे बंद पाळला. त्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.