पिंपरी-चिंचवड : विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक गुरूवारी मंजूर झाले. सोशल मिडिया व दूरचित्रवाणीवरून याबद्दलचे वृत्त झळकताच भाजप नेत्यांनी राज्यभर जल्लोष करण्यास सुरूवात केली. याला पिंपरी-चिंचवड शहरही अपवाद राहिले नाही. चिंचवड येथील ऐतिहासिक चापेकर चौकात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पेढे वाटले, फुगड्या खेळल्या. तसेच सरकारच्या विजयाच्या घोषणाही दिल्या. दरम्यान, आरक्षण मागणीसाठी रान उठविणारे मराठा समाजातील नेते किंवा आंदोलकांनी आनंदोत्सवापासून दूर रहाणे पसंत केले. न्यायालयात निकाल लागून आरक्षण लागू झाल्यावरच आनंद मानला जाईल, अशी त्यांची भूमिका राहिली.
ढोल ताशाचा गजर
ढोल ताशांच्या गजरात टीव्ही चिंचवड येथील चापेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत मराठा समाजाला आरक्षण देणा-या भाजप सरकारचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजपा प्रदेश चिटणीस उमा खापरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष रवी लांडगे, स्विकृत सदस्य वैशाली खाड्ये, रेखा कडाली,मधुकर बच्चे, भाजयुमो पदाधिकारी अजित कुलथे, संजय परळीकर, नीता परदेशी, संजीवनी पांड्ये, नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, करुणा चिंचवडे, नगरसेवक शीतल शिंदे, राजेंद्र गावडे, राधिका बोर्लीकर, अजय पाताडे, विजय लांडे, महेश कुलकर्णी, राजू दुर्गे, सलीम शिकलगार, आर. एस कुमार, विभीषण चौधरी आदी उपस्थित होते.
भोसरीत नगरसेवकांचा आनंदोत्सव
सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानिमित्त भाजपच्या नगरसेवकांनी भोसरीत जल्लोष केला. आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालया समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, अॅड. नितीन लांडगे, वसंत बोराटे, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, अश्विनी जाधव, सारीका सस्ते, सुवर्णा बुर्डे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, प्रा. सोनाली गव्हाणे , भिमाबाई फुगे, नम्रता लोंढे, साधना तापकीर, विजय फुगे, दत्ता परांडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, विजय लांडे, सागर हिंगणे, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर, अजित बुर्डे, पांडुरंग गवळी, उमेश घाडगे, संतोष लांडगे, अमित भिंताडे, महेश मरे, दिनेश पठारे, सचिन शिंदे, अजित सस्ते, नितीन साबळे, जितेंद्र यादव, परांडे मामा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्षवेधी घोषणा
‘तुमचं, आमचं नातं काय, जय भवानी, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भाजप सरकारचा विजय असो’, ‘नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
कोट
अभ्यासपुर्वक आरक्षण दिले आहे. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात देखील हे आरक्षण टिकणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी वारंवार आवाज उठविला. विधानसभेत सरकारकडे विचारणा केली होती. इतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्व घटकाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला देखील लवकरच आरक्षण मिळेल.
-राहुल जाधव, महापौर
मराठा समाजाने जल्लोष करावा – आमदार लक्ष्मण जगताप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला असून, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. भाजप सरकार हे दिलेला शब्द पाळणारे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने जल्लोष करावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
शब्द पाळणारे सरकार
ते म्हणाले, फडणवीस यांनी समाजाची भावना लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास या प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याचे विधेयक विधीमंडळाने मंजूर केले आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल आणि त्यावर राज्यपालांची सही घेतली जाईल. ही सर्व प्रक्रिया 1 डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला.
आमदार महेश लांडगे
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधयेक विधानसभेत सादर करण्यात आले. त्याद्वारे मराठा समाजाला 6 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आज आनंद साजरा करण्याचा दिवस आहे, अशी प्रतिक्रीया आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
धनगर आरक्षणही लवकरच
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारचा कृती अहवाल मांडला आहे. तसेच, याबाबतचे विधेयक पटलावर ठेवले आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले.