मराठा आरक्षण : ‘मागासवर्ग आयोगाचा अहवाल याचिकाकर्त्यांना द्या’

0

उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या आयोगाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने या संबंधीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. ६ फ्रेबुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी सुरु करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू केल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्ते सदावर्ते यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवालाची प्रत मिळावी, अशी मागणी केली होती. ‘हा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत आपण युक्तीवाद कसा करायचा?’, असा सवालही त्यांनी केला होता. आज याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी होती.