मुंबई: मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आली आहे. स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारसहित अनेक संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. दरम्यान मराठा समाजातील तरुण उद्या मंत्रालयावर मोर्चा काढणार असून राज्य सरकारला जाब विचारणार आहेत. राज्यभरतील हजारो तरून उद्या मंत्रालयावर धडकणार आहेत. मराठा ठोक मोर्च्याने राज्य सरकार विरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे नेहमीच आरोप होतात, विरोधकांसह मराठा आंदोलनकर्त्या संघटनांनी देखील राज्य सरकारला लक्ष केले आहे.