मुंबई – बहुचर्चित मराठाआरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत हा विधेयक पटलावर ठेवला. मराठा समाज आरक्षण विधेयक २०१८ या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयक २०१८ सभागृहात मांडल्यानंतर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा घेतल्या. तर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सभागृहातील एक आमदार असलेल्या पक्षापासून ते अपक्ष आमदारांपर्यंत सर्वांचेच आभार मानले. तसेच या विधेयकास एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संमत करण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा सभागृहाबाहेर सर्वांनीच जल्लोष सुरु केला.