मराठा आरक्षण: विरोधीपक्ष विधिमंडळ सदस्यांची बैठक

0

मुंबई-मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने सुरु आहे. राज्यातील सध्या हा ज्वलंत विषय आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी विधिमंडळ सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर राज्यपालांची भेट घेऊन मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहे. मागासवर्ग आयोगाची देखील घेत घेणार आहे.

बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, शिवेंद्र राजे भोसले, आमदार हेमंत टकले, सतीश चव्हाण, शशिकांत शिंदे, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, नवाब मलिक आदी उपस्थित होते.