मराठा आरक्षण श्रेयवादाची लढाई; आपल्यामुळेच आरक्षण मिळाल्याचा सेनेचा दावा

0

मुंबई –गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी होत होती. आज अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने आरक्षणाचा विधेयक मंजूर झाला आहे. दरम्यान आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतूक होत असताना शिवसेनेने आपल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे ट्वीट केले आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंनी सराकारकडे सातत्याने मागण्या केल्या होत्या. त्यामुळेच मराठा मसाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे शिवेसनेने म्हटले आहे.

मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपा आमदार जल्लोष करत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलकांनी भेट घेतली. तत्पूर्वी अजित पवार यांनी मराठा आंदोलकांनी भेट घेतली.