नवी दिल्ली: मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. दरम्यान आज सोमवारी २७ रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठविण्याबाबत सुनावणी होणार आहे. सकाळी ११ वाजता तीन न्यायमूर्तीसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती, मात्र महाराष्ट्र सरकारचे वकील मुकुल रोहतगी हे हजर झाले नसल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. थोड्या वेळात पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे.
पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठांकडे या प्रकरणाची सुनावणी व्हावी अशी मागणी मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी केले आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर मराठा समाजातील एक पिढी उद्ध्वस्त होईल अशी भावना व्यक्त होत आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही अशी टीका होत आहे. सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याचेही बोलले जात आहे.