मराठा क्रांती मोर्चांतर्फे आ.गोटेंच्या पुतळ्याचे दहन

0

धुळे । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि शहराचे आ. अनिल गोटे यांच्यात पत्रक युध्द सुरू आहे. या राजकीय पत्रक युध्दातून वैयक्तिक आणि कौटुंबिक आरोप, प्रत्यारोप झाल्याने वाद विकोपाला गेले. याच पार्श्‍वभूमीवर आ. गोटे यांनी मनोज मोरे यांना जिवे ठार मारण्याची धमकी जाहीर पत्रकातून दिल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने 4 दिवसांपूर्वी पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतर मनोज मोरे यांच्या समर्थनात आणि मराठा समाजाच्या महिलांची बदनामी केली जात असल्याचे म्हणत मराठा क्रांती मोर्चा देखील या वादात उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजक, आयोजकांनी एकत्र येत प्रथम एक बैठक
घेतली.

शहरातील वातावरण बनले संवेदनशील
त्या बैठकीच्या निर्णयानुसार आज 14 रोजी पोलीस अधिक्षक एम. रामकुमार यांची भेट घेत आ. अनिल गोटे यांच्या विरूद्ध निवेदन देण्यात आले. या निवेदनातून आ. गोटे हे मनोज मोरे यांना ठार मारण्याची धमकी देतात. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेला देखील कोणी येणार नाही, तुम्हाला संपवून टाकू, असे घातक वक्तव्य केले असल्याचे म्हटले आहे. तसेच धुळे शहरात सुरू असलेल्या चर्चेवरून त्यांची नावे राजकीय द्वेषाने गुंड गुड्ड्या हत्त्येच्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न आ. गोटे करीत असल्याचा देखील आरोप करण्यात आला. त्यांनी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरपणे शहानिशा करावी. शहराचे वातावरण संवेदनशील झाले असून, मनोज मोरे व मराठा समाजाच्या बांधवांना संरक्षण द्यावे, त्यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी पोलिस प्रशासन व आ. अनिल गोटे यांची असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी साहेबराव देसाई, ज्ञानेश्‍वर पाटील, सुरेश महादू काळे, सुलभाताई कुवर, प्रा. डॉ. भालचंद्र पाटील, अमर फरताडे, सुधीर मोरे, राजेंद्र इंगळे, रजनिश निंबाळकर, दिपक रवंदळ, सुनिल आगलावे, अ‍ॅड. शामकांत पाटील, लहू पाटील, राजकुमार बोरसे, अशोक नारायण पाटील, गजानन मोरे, रणजितराजे भोसले, संजय बोरसे, अनंत पाटील, चिंधा पाटील, चंद्रकांत दादासाहेब मोरे, राजेंद्र पाटील, विलास ढवळे, अनिल पवार, हेमंत भडक, ललिताबाई पाटील, सविता अनिल वाल्हे, श्रृती रजनिश निंबाळकर, स्नेहा मराठे, पल्लवी मोरे, वंदना पवार, सुनंदा मराठे, सुरेखा सोनवणे, अलका बोरसे, देविदास पवार, सागर सोनवणे आदी असंख्य मराठा समाजाच्या महिला- पुरूष उपस्थित होते. गोटेंचा पुतळा जाळला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एकीकडे पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले जात असतांना तरूणांनी एकत्र येत आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील महाराणा प्रताप चौकात आ. गोटे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.