मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

0

चाळीसगाव। राज्यातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीदिनी 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार्‍या मराठा क्रांती मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने लाखोच्या संख्येत मोर्चा काढण्यात आले. मात्र शासनाने दखल न घेतल्याने मुंबई येथे महामोर्चा घेण्यात येत आहे. मराठा समाजाची एकजूट व ताकद राज्यकर्त्यांना दाखवून देण्यासाठी मोर्चा निघणार असल्याचे बोलले जात आहे. या मोर्चात चाळीसगाव तालुक्यातुन 10 हजार समाज बांधव सहभागी होणार असल्याचे माहिती मराठा क्रांती मोर्चा शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. तालुक्यात ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या. महामोर्चाच्या प्रसारासाठी आणि जनजागृतीसाठी संपुर्ण तालुक्यात बैठका घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यांनी केले आवाहन
मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन गणेश पवार, भैय्यासाहेब पाटील, अरुण पाटील, धनंजय देशमुख, बंडु पगार, भाऊसाहेब सोमवंशी, योगेश पाटील, प्रा.तुषार निकम, विनायक मांडोळे, सुजित गायकवाड, महादु पागे, हिरालाल मांडोळे, ज्ञानेश्वर कोल्हे, समाधान मांडोळे, दत्तु पवार यांनी केले आहे. दिपक पाटील, पिंटु पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, श्याम पाटील, यशवंत पाटील, पंकज पाटील, पद्ममाकर पाटील, बाळासाहेब नेरकर, संजय बावीस्कर, राजेंद्र पाटील, संता पहेलवान, पांडुरंग निकुंभ, शिवाजी निकुंभ, किशोर शेळके, निलेश पाटील, संजीव पाटील, ओझर संदीप पाटील, संजय पाटील, अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, शांताराम पाटील, दिपक पाटील, दिनेश पाटील, प्रभाकर पाटील, भागवत पाटील, बंटी पाटील, विलास पाटील, प्रमोद पाटील, रावसाहेब पाटील, घनश्याम पाटील, संतोष पाटील, दिपक पाटील, राजेंद्र पाटील, तुषार चव्हाण, सचिन पाटील, सचिन पाटील, दिपक चव्हाण, पप्पु पाटील, रोहीत जाधव, कृष्णा जाधव, अभिमन्यू पाटील, शरद पाटील, शालीक सूर्यवंशी उपस्थित होते.

या गावातुन जाणार
ब्राह्मणशेवगे, माळशेवगे, अधारी, हातगाव, शिंदी, गणेशपुर, ताबोळे, घोडेगाव, करजगाव, तळेगाव, पिपळगाव, टाकळी प्र.चा, ओझर, पांतोडे, वाघळी, मुदखेडे, खरजई , तरवाडे, कोदगाव, वाघडु, वाकडी, देशमुख वाडी, धामणगाव, खडकी सिम आदींगावांमध्ये कॉनर सभा घेण्यात आल्या असून या गावातुन शेकडोच्या संख्येने बांधव मोर्चासाठी मुंबई येथे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.