मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनानंतर रावेर शहर कडकडीत बंद

0

रावेर- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर रावेर शहरातील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. मंगळवारी सकाळी संभाजी ब्रिगेडचे योगराज महाजन, राजू महाजन, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिन पाटील, धनराज महाजन, भूषण महाजन, लखन महाजन, जितेंद्र महाजन यांच्यासह असंख्य मराठा समाजबांधवांनी शहर बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापार्‍यांनी त्यास प्रतिसाद दिला. शहरातील डॉ.आंबेडकर चौक, छोरीया मार्केट, एम.जे.मार्केट, बसस्थानक परीसर, मुख्य रस्त्यावर घोषणाबाजी करीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली तसेच छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. पोलिस प्रशासनातर्फे शहरात कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे.