जळगाव । मराठा समाजाच्या वतीने कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व निर्घृण हत्याचे प्रकरण आजतागायत राज्यामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यात लाखो बांधवाचे 53 मोर्चे निघालेले आहेत. या शिवाय देशात 8 ठिकाणी व परदेशात 6 ठिकाणी या मोर्चाला पाठिंबा देणारे मोर्चे निघाले आहेत. या मूक मोर्चामध्ये सामील झालेल्या प्रत्येक बांधवाने, महिलांनी, शेतकर्यांनी, विद्यार्थ्यांनी शिस्तीचा पाठ घालून कायदा व सुव्यवस्थेचा आदर केलेला आहे. प्रत्येक मोर्चामध्ये जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदने दिलेली आहेत. सदर निवेदनांमध्ये मराठा समाजाच्या, शेतकर्यांच्या, विद्यार्थ्यांसह अनेक विषयांच्या बाबतीत मागण्यांचे निवेदन सादर केलेले आहे. नंतर एकत्रित निवेदनही देण्यात आले आहे. उपरोक्त निवेदनातील अनेक मागण्या आजही मान्य झालेल्या नसून मात्र घोषणा देण्यात आल्या तर अंमलात आले नाही. एक-दोन मागण्यांमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत. कोपर्डीची केस अजूनही न्याय प्रविष्ठ असल्यामुळे राज्यासह इतर राज्यातून मराठा समाज बांधव महामोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. बुधवार 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.
समाज बांधवांच्या या आहेत मागण्या
कोपर्डी प्रकरणातील नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा आरक्षण, अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी, सरसकट कर्जमुक्ती व हमीभाव मिळणे आदींसह विविध मागण्या मराठा समजातर्फे करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरीत सुरु करणे. छत्रपती शिवरायांचे गडकोट विकासाचे काम त्वरित हाती घ्यावे. राजर्षी शाहू महाराजांच्या शाहू मिल कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम चालू करण्यात यावे यांसह विविध मागण्या समाज बांधवांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी सुलोचना वाघ, मंगला पाटील, विकास नरवाडे, अजित पाटील, राजेंद्र चौधरी, डॉ.सुरेश पाटील, राम पवार, निवृत्ती पाटील, कैलास पाटील आदींची उपस्थिती होती.