जळगाव। वर्षभरापासून मराठा समाजाच्या विविध मागण्याची सरकार दखल घेत नसल्याने मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांतीचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती महामोर्चा मूक स्वरुपात असून तीव्र भावना व्यक्त करण्यात येणार आहे. लाखोच्या संख्येन देशासह विदेशात राहणारे समाजबांधव मोर्चात सहभागी होणार असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 4 रोजी जळगाव शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे दुचाकीरॅली काढून जनजागृती करण्यात आली. रॅलीत पाचशेपेक्षा अधिक दुचाकीस्वार सहभागी झाल़े जिल्ह्याभरातुन मराठा समाज बांधव रॅलीत सहभागी झाले होते. भगवे झेंडे हाती असलेल्या दुचाकीस्वारांनी लक्ष वेधले होते. काव्यरत्नावली चौक येथे सकाळी 10 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला.
यांची होती उपस्थिती
यावेळी उद्योजक श्रीराम पाटील, किरण बच्छाव, बाळासाहेब सुर्यवंशी, रवी देशमुख, डॉ.राजेश पाटील, किरण साळुंखे, विनोद देशमुख, सुरेंद्र पाटील, राम पवार, सुदाम पाटील, विकास नरवाडे, प्रा.डी.डी.बच्छाव, दिपक सुर्यवंशी, विलास पाटील, अॅड.सचिन पाटील, अॅड.सचिन चव्हाण, अॅड.अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील, कृष्णा पाटील, सुरेश पाटील, प्रमोद पाटील, धनंजय पाटील, संजय सोनवणे, समीर जाधव, मल्हार जाधव आदी उपस्थित होते. काव्यरत्नावली चौकातून रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीचा मार्ग
या रॅलीत शहर व ग्रामीण भागातून तरूणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. आकाशवाणी चौक, रिंगरोडमार्गे, आयएमआर कॉलेज, ख्वॉजामिया, कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर, जुने बसस्टॅन्ड, शिवाजी चौक, मुख्य स्टेट बँक, स्वातंत्र्य चौकातून पुन्हा आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीचा समारोप झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी उपस्थितांना मुंबई येथील महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन केले.