तर्हाडी। मुंबई मराठी क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी 9 ऑगस्ट रोजीच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी धुळे शहराचा नगावबारी येथून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत हातात भगवे झेंडे घेऊन हजारो युवक, युवती, वकील, डॉक्टर, महिला, पुरुष, लहान बालके मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीचा नराधमांना फाशी व्हावी, या सारख्या अन्य मागण्यासाठी मुंबईत दि 9 ऑगस्टला मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरकारला जाग येऊन मराठा समाजाच्या मागण्या तत्काळ मान्य व्हाव्या यासाठी मराठा जनजागृती व मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबई येथे उपस्थित राहण्यासाठी भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
रॅलीचा शिवतीर्थ येथे झाला समारोप
धुळे शहरातून निघालेली मोटार सायकल रॅली देवपूर, मोठापूल, आग्रारोड मार्गे, रेल्वे स्टेशन रोड, चितोड रोड, फाशी पूल, वरून शिवतीर्थ येथे समारोप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयघोषाने धुळे शहर अक्षरशः दणाणून सोडल होते. मोटार सायकल रॅली अतिशय शिस्तीने काढण्यात आली. मोटार सायकल रॅली बघून धुळेकर वासियांना 28 सप्टेंबर 2016 च्या मराठा क्रांती मोर्चाची आठवण झाली. हजारोंच्या संख्येने मोटार सायकली निघाल्या या मोटार सायकल रॅलीचे नेतृत्व फक्त न फक्त समस्त मराठा समाजच करत होता. यावरून दिसून आले व मुंबई येथे होणार्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाला धुळे जिल्ह्यातून मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येने जाणार आहेत