मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन; चाळीसगाव येथे बैठक

0

चाळीसगाव। मुबंई येथे 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी तसेच मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन मुख्य समन्वयक महाराष्ट्र रवींद्र काळे औरंगाबाद यांच्याहस्ते उद्या 29 जुलै शनिवार सकाळी 11 वाजता हिरापुर रोडवरील संभाजी सेना कार्यालय येथे होणार आहे त्याचबरोबर तालुक्यातील मराठा समाज बांधवाची बैठक मराठा क्रांती मोर्चा चाळीसगांव शाखेच्या वतीने आयोजित केली आहे.

मुबंई येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी 9 ऑगस्ट 2017 रोजी मराठा क्रांती मोर्चा होणार असून त्या नियोजनाकरीता तालुक्यातील मराठा समाज बांधवांची बैठक मराठा क्रांती मोर्चा चाळीसगांव शाखेच्या वतीने आयोजित केली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा चाळीसगांव कार्यालयाचे उद्घाटन मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक महाराष्ट्र रवींद्र काळे औरंगाबाद तसेच जिल्हा समन्वयक प्रा.डी.डी.बछाव यांच्याहस्ते होणार असुन ते मार्गदर्शन करणार आहेत.