मुंबई: मराठा क्रांती संघटना लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार आहे असे बोलले जात आहे. याबाबत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. आगामी निवडणुका या पक्षाच्यावतीने लढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
१ सप्टेंबरपासुन राज्यभर दौरा करून आपण सर्व मराठा व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधीना भेटणार आहोत.त्यांच्याशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेउनच पुढील कृती केली जाणार आहे, असं ते म्हणाले.