मराठा समाजाची बदनामी होईल अशी आक्षेपार्ह पोष्ट करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समजाचे निवेदन
मुक्ताईनगर प्रतिनिधी …... ,मराठा समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आ. चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे मराठा समाजासाठी सुमारे २.२० कोटी तर बोदवड येथे सुमारे ७० लक्ष अशा भरीव निधीसह सामाजिक सभागृहे मंजूर करून दिले त्यामुळे भविष्यात मराठा समाजातील गोर गरीब कुटुंबातील लग्न सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी खुप मोठी सुविधा होणार असून आमदारांनी केलेल्या या कार्याचे कौतुक म्हणून मराठा समाजातील १३ विविध संघटनांनी तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी मुक्ताईनगर येथे एकाच मंचावर येवून मराठा समाजातर्फे घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात आ.चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. या सोहळ्याविषयी पोटशुळ उठलेल्या विजय पाटील नामक बोदवड तालुक्यातील एका पक्षाच्या भाडोत्री समाजकंटकाने गेल्या दोन दिवसांपासून आ. चंद्रकांत पाटील यांच्या विषयी व या सत्कार सोहळ्याविषयी आक्षेपार्ह व शिवराळ भाषेत तसेच मराठा समाजातील दोन गटात तेढ निर्माण होईल अशा संतापजनक पोष्ट सोशल मिडीयात व्हायरल केलेल्या आहेत. या समाज कंटकाच्या वादग्रस्त सोशल मीडियातील पोष्ट कायदा व सुवस्था भंग होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असून अशा भाडोत्री समाज कंटकावर तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा मराठा समाजातर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे निवेदन मुक्ताईनगर तालुका मराठा समाजातर्फे मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, व तहसिलदार वाडे यांना दिले.
निवेदन देतेवेळी, मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, दिलीप श्रीराम पाटील, राजेश पाटील ढोले, वाय डी पाटील, चंद्रकांत सोनू मराठे, गणेश विश्वनाथ पाटील, चेतन रघुनाथ पाटील, रविंद्र चव्हाण, प्रफुल्ल पाटील,कृष्णा पाटील, गजानन पाटील, नंदकिशोर बंगाळे, योगेश्वर तिजारे, सौरव पाटील, किशोर पाटील, कृष्णा बंगाळे, गोपाळ चौबे, भूषण पाटील, संतोष पाटील, उमेश पाटील, संदीप जंजाळ, प्रदीप कोल्हे, ज्ञानेश्वर पाटील, बाळू पाटील, गणेश श्रीकृष्ण पाटील, पांडूरंग पाटील, अमोल पाटील, विशाल डहाके, शिवराज पाटील, संतोष मराठे , जितेंद्र मुऱ्हे आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान,
याप्रकरणी संतप्त जमावाला शांत करण्यासाठी सदरील समाज कंटकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने , व यानंतर मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या फिर्यादीनंतर विजय पाटील नामक समाज कंटक याचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.