जळगाव : मराठा सेवा संघ वधुवर सूचक मंडळातर्फे आज नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात वधुवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात 60 मुला-मुलींनी तर 100 पालकांनी आपला परीचय दिला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी वधुवर सूचक मंडळ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बी.टी. देवरे होते तर मेळाव्याचे उद्घाटन जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व जिजाऊ पूजनाने करण्यात आली. प्रा.बी.एन. पाटील यांनी जिजाऊ वंदना सादर केली.
परीचय मेळावे ही काळाची गरज
प्रास्ताविक जिल्हा वधुवर मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. उर्मिला पाटील यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी समाजातील चालीरीती, रुढी, परंपरा व वधुवर पालक परीचय मेळावे ही काळाची गरज बनली आहे यावर त्यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. या मेळाव्यास जळगाव, धुळे, नंदुबार, बुलढाणा, औरंगाबाद आदी ठिकाणाहुन मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात बी.टी. देवरे यांनी गुणवत्ता, उंची, कुंडली, तसेच घटस्फोटितांचे प्रश्न यावर मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील खुशाल चव्हाण, सयाजी घोंगल, चंद्रकांत घोडके, डी.डी. पाटील, अंकुश पाटील, सुरेश पाटील, शामराव साळुंखे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.एन. पाटील व प्रा.वाय.एन. साळुंखे यांनी केले तर आभार साहेबराव पाटील यांनी मानले.