आर्थिक सामाजिक मागास गटात बारा टक्के आरक्षण ; राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय
यावल- मराठा समाजाला आर्थिक सामाजिक मागास गटात 12 टक्के आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आज गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविल्याने मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. समाजातील वंचित घटकांना आवश्यकता असल्यास राज्य सरकार स्वतः विशेषाधिकारमध्ये आरक्षण देऊ शकेल, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक, सामाजिक प्रवर्ग (एसईबीसी) या घटकालाही मान्यता मिळाली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या आर्थिक असमानता, रोजगार, शैक्षणिक मागासलेपणा आदी मुख्य समस्या या आरक्षणाच्या माध्यमातून मार्गी लागतील, असा विश्वास समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. भुसावळ विभागात न्यायालयाच्या निर्णयानंतर फटाक्यांची आतषबाजी व पेढे भरवून जल्लोष करण्यात आला.
यावलमध्ये आनंदोत्सव
यावल- मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिलेल्या या निर्णयाचे यावल तालुक्यातील समस्त मराठा समाजाच्या वतीने यावल शहरातील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्यासमोर मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल वसंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष व नगरसेवक प्रा.मुकेश पोपटराव येवले, पत्रकार डी.बी.पाटील, मराठा समाज बहुउद्देशीय संघाचे सदस्य सुनील गावडे, प्रा.संजय कदम, अजय पाटील, महावितरणचे दिलीप मराठे, देवकांत पाटील, यज्ञेश्वर कदम, अरुण लोखंडे, बापु जासूद यांच्यासह अनेक समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
रावेरमध्ये पेढे वाटून जल्लोष
रावेर- मराठा समाज आरक्षण वैध असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिल्यानंतर मराठा समाजात आनंदोत्सव साजरा होत आहे. या निर्णयाचे रावेर येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषदेचे माजी सभापती सुरेश धनके, भाजप उप जिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद वायकोळे, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, स्वाती चौधरी, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील, गोपाळ नेमाडे, महेश चौधरी, शिवाजीराव पाटील, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, संजय गांधी अध्यक्ष विलास चौधरी, अहमद जबरा, पवन चौधरी, नथ्थु धांडे, सलीम तडवी, मनोहर तायडे, मनोज श्रावक, भास्कर बारी, अजबराव पाटील, सी.एस.पाटील, नगरसेवक यशवंत दलाल उपस्थित होते.