मराठा समाज आरक्षणास आमदार संजय सावकारेंचा पाठिंबा

0

भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा संघटनांकडून क्रांतीदिन महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीला भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पाठिंबा दिला आहे. भुसावळ शहर व तालुक्यातील व्यावसायीकांनी बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे व बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आंदोलकांनी मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडावा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सार्वजनिक व व्यक्तीगत मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी व आंदोलन यशस्वी होण्यासाठी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य समाधान आप्पा पाटील, ज्ञानेश्वर आमले, रवी ढगे यांनी केले आहे.