काकासाहेब शिंदेंच्या बलिदानानंतर मराठा बांधवांनी पाळले सुतक
अमळनेर- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहयाच्या आवारात सकल मराठा समाजातर्फे कै काकासाहेब शिंदें यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजातील बांधवांनी स्वतचे मुंडन करून या बलिदान देण्यार्या मराठा बांधवाचे सुतक पाळले आहे. या निषेधाच्या वेळी सरकारविरोधी विविध घोषणा देण्यात आल्या. या निषेधार्थ हजारो तरुण शाळेचे महाविद्यालयातील विद्यार्थी विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.